जॉर्डनचे माजी क्राऊन प्रिन्स हमजा बिन हुसैन नजरकैदेत

जॉर्डनचे माजी क्राऊन प्रिन्स हमजा यांनी आपल्याला घरातच नजरकैद केल्याचं सांगितलं आहे.

प्रिन्स हमजा यांनी हमजा बिन हुसैन यांच्या वकिलांनी एक व्हीडिओ बीबीसीला पाठवला आहे. प्रिन्स हमजा हे किंग अब्दुल्ला यांचे सावत्र भाऊ आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि छळाचे आरोप करण्यात आले आहेत. हा प्रकार समोर आल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मोठ्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

याआधी प्रिन्स हमजा यांना नजरकैद केल्याचं वृत्त सैन्यानं फेटाळलं होतं.

मात्र देशाचे संरक्षण आणि स्थैर्याला धोकादायक ठरणाऱ्या त्यांच्या हालचालींना रोखल्याचं सैन्यानं सांगितलं होतं.

प्रिन्स हमजा काय म्हणाले?

प्रिन्स हमजा यांनी आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचं सांगितलं आहे तसेच कोणत्याही कटात आपण सामिल नसल्याचं त्यांनी सांगितलं.

शनिवारी रेकॉर्ड केलेल्या व्हीडिओत ते म्हणतात, “जॉर्डनच्या सैन्याचे चीफ ऑफ जनरल स्टाफ आज सकाळी माझ्या घरी आले होते. मी ज्या बैठकांमध्ये सहभागी झालो त्यामुळे सोशल मीडियावर होत असलेल्या पोस्ट्समुळे सरकार आणि राजेसाहेबांवर टीका होते त्यामुळे मला बाहेर जाण्याची, लोकांशी बोलण्याची परवानगी नाही. असं त्यांनी मला सांगितलं.”

पण मी स्वतः टीका केल्याचा माझ्यावर आरोप नसल्याचं सांगितलं.

अर्थात, त्यानंतर ते पुढे म्हणाले, “सरकारमधील पडझड, भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेसाठी मी जबाबदार नाही. हे सगळं आपल्या शासनव्यवस्थेत गेल्या 15-20 वर्षांपासून होत आहे आणि ती स्थिती अधिकच चिघळत चालली आहे. त्यांच्या (सरकारच्या) संस्थांमध्ये लोकांचा विश्वास कमी होण्याला मी जबाबदार नाही.”

“कोणीही धमकावल्याशिवाय, अटक करुन छळल्याशिवाय बोलू शकत नाही अशा स्थितीत आपण पोहोचलो आहोत.”

जॉर्डनमध्ये उच्चपदस्थ राजकीय नेत्यांना अटक होण्याच्या घटना फारशा घडत नाहीत. मध्य पूर्वेत अमेरिका जॉर्डनचा मुख्य सहकारी आहे.

कोरोना व्हायरसच्या साथीनंतर जॉर्डनच्या गुप्तचर संस्थेला जास्त अधिकार देण्यात आले आहेत. त्याला मानवाधिकार संघटना विरोध करत आहेत.