ग्राम पंचायतचा सहभाग असलेले बीड जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर

केज प्रतिनिधी,
24सात । मराठी
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील कोविड केअर सेंटर मधील ७ रूग्णांना कोव्हिड मुक्त करून अगदी यशस्वी उपचार करून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आले.

नवचेतना सामाजिक संस्था, ग्रामपंचायत कार्यालय कुंबेफळ व डॉ. योगिनी थोरात यांच्या वतीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने कुंबेफळ येथे मागच्या आठवड्यात हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्ये जिल्हा परिषद सदस्या डॉ. योगिनी थोरात ह्या स्वतः येथील रुग्णांवर उपचार करत असल्याने अनेक रुग्ण व परिसरातील नागरिक यामुळे समाधानी आहेत. यामुळे आस पासच्या गावातील रुग्णांची मोठी सोय झालेली आहे. तर शनिवारी ७ रुग्णांना कोरोना मुक्त करुन डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी डॉ. योगिनी थोरात, डॉ.सय्यद मॅडम, सरपंच सुवर्णा किशोर थोरात, उषा गोपाळघरे, रोहित धपाटे, नवचेतना चे महादेव जोगदंड आदींची उपस्थित होती.

कोविड सेंटर चालवण्यासाठी कुंबेफळ ग्रामपंचायत चा मोलाचा वाटा

तालुक्यातील कुंबेफळ येथील कोविड सेंटर सुरू केल्याने येथे रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. कुंबेफळ च्या सरपंच सुवर्णा किशोर थोरात यांनी यासाठी आवश्यक ते नियोजन करून पाणी व स्वच्छता याची मोठी मदत केली असुन ग्रामपंचायतचा सहभाग असणारे जिल्ह्यातील बहुधा हे पहिलेच कोविड सेंटर आहे.