केज शहरातील लाॅकडाऊन शिथिल करा – जनविकास परिवर्तन आघाडी

इक्बाल शेख,
24सात ।‌ मराठी

जनविकास परिवर्तन आघाडीचे हारुनभाई इनामदार यांनी केज शहरातील गरीब, कष्टकरी मजुर व शेतकरी यांच्या समस्या लक्षात घेऊन केजचे तहसीलदार यांना लॉकडाऊन शिथील करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे.

कोरोना या साथीच्या आजारामुळे संपुर्ण विश्व भयभीत झाले आहे. आपल्या भारत देशाची देखील तीच अवस्था सध्या पहावयास मिळत आहे. मागील एक वर्षाहून अधिक काळापासून सतत लॉकडाउन असल्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, अशा गरीब कष्टकरी, मजूर, शेतकरी यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच येत्या 15 जुन पर्यंत महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे केज शहरामध्ये राहणाऱ्या गरीब कष्टकऱ्यांचे हातावर पोट असल्यामुळे त्यांची जगण्याची अत्यंत बिकट अवस्था निर्माण झाली आहे. त्यांच्या घरामध्ये अन्नाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, म्हणून आपण त्यांच्या वरील जीवनावश्यक असणाऱ्या बाबींकडे लक्ष देऊन 15 जुन पर्यंत असणाऱ्या लॉकडाऊन मध्ये त्यांना काम व मजुरी करीता सुट देत लॉकडाऊन मध्ये शिथीलता देण्यात यावी. जेणेकरून त्यांना दिलेल्या वेळेमध्ये त्यांची उपजीविका भागविता येईल. असे निवेदन केज तहसील चे नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

सदरील बाबींकडे आपण गांभीर्याने विचार करावा अन्यथा सर्व मजूर, कामगार, कष्टकरी, शेतकरी आपल्या दालनासमोर अमरण उपोषण करतील. असे या निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी जनविकास परिवर्तन आघाडीचे हारुनभाई इनामदार, अशोक गायवाड, सुमेध बप्पा शिदे, धम्मपाल गायकवाड, रोहित कसबे आदिंच्या सह्या निवेदनावर करण्यात आले आहेत.