कोरोनाकाळात मुलांना ‘MIS-C’ आजाराचा किती धोका आहे?

इक्बाल शेख,
24सात । मराठी


कोव्हिड 19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही त्याचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना जास्त असेल, असा इशाराही देण्यात आलाय. याबातत तज्ज्ञांचे मतभेद आहे. पण खबरदारी म्हणून महाराष्ट्रामध्ये बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स स्थापन करण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या मते कोरोनातून मुले लवकर बरी होतात हे खरयं पण दुसऱ्या बाजुला त्यांच्यासमोर एका नवीन धोक्याची घंटा वाटत आहे. त्याचं नाव आहे MIS-C. MIS-C म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन.

नक्की काय आहे हा आजार? आणि त्याची लक्षणे

केज येथील योगिता नर्सिंग होम अँड पेडियाट्रीक क्रिटिकल केअर हॉस्पिटल चे बालरोगतज्ज्ञ डॉ. दिनकर राऊत यांच्या मते ज्या बालकांना कोरोना झालेला असेल किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीला कोरोना झालेला असेल अथवा 2 ते 6 आठवड्यांचा ताप असेल, शरीरावर लाल पुरळ, लाल डोळे, अतिसार, पोटदुखी अशी लक्षणे बालकांमध्ये आढळून आले असतील तर हा MIS-C हा Post covid आजार असु शकतो. हा तिव्र प्रमाणात झाला तर हृदय (Herat), फुफ्फुसे (Liver), मुत्रपिंड (Kidneys) किंवा मेंदू (Brain) यांना धोका पोहचवु शकतो. ज्यामुळे बालकांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशा प्रकारे Post Covid किंवा Covid संपर्कात येणाऱ्या बालकांना वरील लक्षणं असतील तर त्वरीत तज्ञांना दाखवून घ्यावे.

 

हा विषाणु खुप नटखट आहे वारंवार आपले रुप बदलत राहतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण खुप वयस्क पिढीतील आपले लोक गमावले होते. सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण खुप तरूणांना गमावलेले आहे. म्हणून हा विषाणु आपले रूप नेहमी बदलत आहे. आगामी काळात हे Mutetion बालकांवर परिणाम करेल याची शक्यता खुप कमी आहे. तरी ही काळजी म्हणून महाराष्ट्र सरकार व बालरोग तज्ञ (Task force) हे समन्वय साधुन आगोदरच यावरील उपाययोजना करत आहेत. त्यामुळे पालकांनी या तिसऱ्या लाटेबद्दल घाबरून जाऊ नये