असदभाई खतीब यांना स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती

इक्बाल शेख,
24सात । मराठी


केज नगर पंचायतच्या स्थापनेपासून प्रभारी स्वच्छता निरीक्षक पदाचा पदभार सांभाळणारे वरिष्ठ सहाय्यक असद इसाकोद्दीन खतीब यांची या पदावरून स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याचा आदेश नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक डॉ किरण कुलकर्णी यांनी 4 जून 2021 रोजी निर्गमित केला आहे.

महाराष्ट्रातील एकुण 67 नगर परिषदा आणि नगर पंचायती मध्ये कार्यरत असलेल्या विविध पदावर काम करणाऱ्या 67 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना वेतन व भत्ते मिळणार आहेत.

असद खतीब यांनी कोरोना काळात अतिशय महत्वाची भुमिका बजावली असून मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध व शासनाचे आदेश डावलून दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांविरूद्ध दंडात्मक कारवाई करून आपले कर्तव्य चोखपणे बजावले आहे.

असद खतीब यांची पदोन्नती स्वच्छता निरीक्षक पदावर झाल्यामुळे त्यांच्यावर मित्र परिवार व कर्मचाऱ्यांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रविवारी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन पहिला कौटुंबिक सत्कार करण्यात आला. यामध्ये मुश्ताक खतीब, हाजी अमजद खतीब, रूस्तुम खतीब, मुजफ्फर खतीब, मुबश्शिरोद्दीन खतीब, हाफिज मुकिम सहाब, मजरोद्दीन खतीब, इंतेखाब रुस्तुम खतीब व निजाम इनामदार यांनी केला आहे.