ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या दौऱ्यानंतर अर्धे केज अंधारात

ब्युरो रिपोर्ट,
24सात । मराठी
दिनांक 11 जुन रोजी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या बीड जिल्हा दौरा दरम्यान अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. ऊर्जा मंत्री केज येथे आले असता माजी खासदार रजनीताई पाटील यांच्या शिवनेरी निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महावितरणचे बीड येथील अधिक्षक अभियंता यांच्यासह कार्यकारी अभियंता व केजचे उप विभागीय अभियंता हे उपस्थित होते. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज वितरण संबंधित ग्राहकांकडून अनेक तक्रारी येत असल्याचे सांगत, यापुढे अशा तक्रारी येऊ नये अशी सुचना दिली. मात्र महावितरणचे केज येथील उपविभागीय कार्यालय यांच्यावर सुचनेचा कुठलाच परिणाम न होता. पुन्हा जैसे थे च्या भुमिकेत ते आले आहे.

शनिवारी पाऊस आणि वारा सुटल्याने बीड रोडवरील विजेचे खांब कोसळले, ज्यामुळे विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासंदर्भात अनेकांनी लाईनमन पासुन ते अधिक्षक अभियंता यांच्यापर्यंत फोन लावले. काहींचा मोबाईल बंद होता तर काहींचा प्रतिसाद मिळाला नव्हता. तर काहींडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत अर्ध्या केजचा विद्युत पुरवठा बंदच होता.

ऊर्जा मंत्री ज्या भागात गेले नेमका तोच भाग अंधारात

ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे शिवनेरी निवासस्थान येथुन बीड रोडवरील फुले नगर भागात त्यांचे कार्यकर्ते राहुल वाव्हळे यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी गेले होते. मात्र राज्यमंत्री जाताच दुसऱ्याच दिवशी या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला विद्युत पुरवठा 24 तास होऊन ही दुरुस्त करण्यात आला नाही. ज्यामुळे नागरीकांमध्ये महावितरण विरोधात रोष निर्माण होत आहे.

दुरुस्तीसाठी विलंब का?

महावितरणकडून दुरुस्तीसाठी ज्या एजन्सीकडे काम देण्यात आले आहे. त्या एजन्सी ला झालेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याने संबंधित एजन्सी कामास टाळाटाळ करत असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.