वास्तु व वस्तुंचा शाळेत वापर करून BALA संकल्पना राबवावी : ग.शि.अ. नवनाथ सोनवणे

इक्बाल शेख,
24सात । मराठी

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आडस येथे कोविड-19 चे सर्व नियम पाळुन सुंदर माझे कार्यालय/सुंदर माझी शाळा व BALA संकल्पना अंतर्गत केंद्रातील सर्व शिक्षकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत जेष्ठशिक्षणविस्तार अधिकारी नवनाथ सोनवणे यांनी परळी गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्विकारल्या बद्दल त्यांचा आडस केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रथमतः प्रास्ताविकात शेख असाहबोद्दीन यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.

बैठकीत मार्गदर्शन करताना परळीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे म्हणाले की सर्व शिक्षकांनी 100% पुर्ण वेळ शाळेत उपस्थित राहुन सुंदर माझे कार्यालय/सुंदर माझी शाळा हा उपक्रम शिक्षक आणि समाजाच्या सहभागातून राबवणे व त्या अंतर्गत स्वच्छालयाची स्वच्छता, अभिलेखे वर्गीकरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, शाळेची रंगरंगोटी, सिड बँक, पुर्नभरन, अडगळीत साहित्य निर्लेपन करणे, शाळा डिजिटल करणे, हँड वॉश स्टेशन यासह 26 उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून सुंदर माझे कार्यालय/सुंदर माझी शाळा हे अभियान यशस्वी करून शाळेच्या वास्तु आणि वस्तुंचा पुरेपुर वापर करून शाळा स्वच्छ आणि सुंदर करण्याचे आवाहन केले.

केंद्रप्रमुख सुखदेव तोंडे यांनी BALA या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की समाजाचा व शिक्षकांचा सहभाग घेऊन शाळे भोवतीचे वातावरण निसर्गरम्य करणे, शाळेच्या प्रत्येक वस्तुंचा अध्ययन साहित्य म्हणुन वापर करता येईल या साठी शाळेच्या भिंती, दारे, खिडक्या, पायऱ्या, झाडे, झाडाचे ओटे यांचा वापर करून शाळेतील प्रत्येक वस्तु बोलकी करणे. मुलांना दिसले व ऐकले की अध्यापन आपोआप होते. जेणे करून विध्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण होईल, अशा प्रकारे शाळा आनंददायी करण्याचे आवाहन केले.

केज तालुक्यातील राबविण्यात आलेल्या BALA उपक्रमाची माहिती विषयतज्ञ श्रीमती रुपनर एम. डी. यांनी दिली तर सुंदर माझे कार्यालय/सुंदर माझी शाळा या उपक्रमाची माहिती श्रीमती सुरेखा कदम यांनी दिली. तंत्रस्नेही शिक्षक विकास मुळे यांनी सेतु या उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमा अंतर्गत कन्या शाळा आडसचे शिक्षक शाळेची डागडुजी आणि रंगरंगोटी स्वत: करत आहेत. इतर शिक्षकांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कार्य करावे म्हणून कन्या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठोके, शिक्षक फुलचंद रोडगे, अतुल वखरे, विकास मुळे यांचा सोनवणे साहेब यांनी सत्कार केला.

या कार्यक्रमा साठी केंद्रीय मुख्याध्यापक अनंत शेळके, व्यंकटेश विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण शेप, शाहू धिरे, रेपे डी. पी., युवराज हिरवे, सुनील वैरागे, श्री अंजन, श्री देशमुख, स्वामी शिवानंद, श्री भंडारी, श्री शितोळे, श्री चव्हाण ईत्यादी शिक्षकांनी बैठक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शेख असाहबोद्दीन यांनी केले तर आभार प्रदर्शन केंदीय मुख्याध्यापक अनंत शेळके यांनी केले.