पंतप्रधान पीक विमा योजनेला राज्यात 23 जुलैपर्यंत मुदतवाढ

इक्बाल शेख,
24सात । मराठी


पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 23 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याआधी या योजनेत सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख 15 जुलै ही होती. पण, राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत 23 जुलैपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठवला होता.

या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी 23 जुलैपर्यंत पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 23 जुलैपर्यंत पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मान्यता देणारं केंद्र सरकारचं पत्रक खालीलप्रमाणे आहे.

 

दरम्यान, पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारनं 29 जून 2020 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, खरीप हंगाम 2020 पासून पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. याचाच अर्थ 2020 पासून पुढच्या 3 वर्षांसाठी पीक विम्याची रक्कम, विमा हप्त्याचा दर आणि तुमच्या जिल्ह्यासाठीची कंपनी कायम राहणार आहे.

यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या खरीप हंगामाकरीता पीक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आता 23 जुलै ही आहे.