जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी होणार

इक्बाल शेख,
24सात । मराठी

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार योजनेतील 1000 कामांची चौकशी होणार आहे. ही बातमी विविध वर्तमानपत्रं आणि टिव्ही चॅनल नी प्रसिद्ध केली आहे.

या योजनेतील कामांची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांची समिती स्थापन केली होती.

या समितीने जलयुक्त शिवार योजनेतील 1000 कामांची चौकशी करावी अशी शिफारस केली आहे. यानुसार 900 कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तर 100 कामांची विभागीय चौकशी होणार आहे.

भाजपच काय म्हणणं आहे

भारतीय जनता पार्टीने या घडामोडींवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला बदनाम करताना अन्नदात्याच्या पोटावर पाय देण्याचे पाप करू नये असं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी मांडले आहे.