पोलिसांना जागेची चुकीची माहिती देत, नगर पंचायत ने केली बंदोबस्ताची मागणी

प्रतिनिधी,
24सात । मराठी


केज : शहरातील धारुर रोड वरील सर्वे नं. 118/5 मधील मुळ शेतकऱ्याकडून सय्यद अमजत हमीद व फुरखान शेख या दोन लोकांनी खरेदी खत आधारे जागा खरेदी केली. जागेची शासन नियमानुसार सर्व कायदेशीर सात बारा व नगर पंचायत कार्यालयात नोंद असताना, नगर पंचायत प्रशासनाकडून मालकी हक्काच्या जागेवरुन ताबा काढण्यासाठी पोलीसांना सदरील रस्ता 18 मिटर असल्याची चुकीची माहीती देण्यात आली आहे.

शासनाच्या नियमानुसार शहर विकास अराखडा मंजुरी नंतर ज्या शेतकऱ्यांची जागा डि.पी प्लॅन मध्ये गेलेली आहे. अशा शेतकऱ्यांना जागेचा भु संपादन मोबदला दिला जातो. त्याशिवाय जागेवरील ताबा काढता येत नाही. सदरील जागेच्या बाजुने जाणारा रस्ता हा पायवाट म्हणुन पीटीआर वर नोंद आहे. तहसील कार्यालयाचे तात्कालिक तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी जागेसंदर्भात दिलेल्या अधिकृत कागदपत्रे संबंधित जागा मालकाकडे असुनही नगर पंचायत प्रशासन संबधितावर प्रशासकीय दबाव आणत असल्याचे जागा मालकाचे म्हणणे आहे.

शहरातील धारुर रोडवरील सर्वे नं. 118/5 या जागेसंबधी प्रकरण न्यायलयात न्यायप्रविष्ट असुनही मालकी हक्काच्या जागेवरील ताबा काढण्यासाठी नगर पंचायत दबाव टाकत असल्याचा आरोप करत या दबावामागे राजकीय खेळी असल्याचे जागा मालक सय्यद अमजत व शेख फुरखान यांचे म्हणणे आहे.