वाहनाच्या नंबरप्रमाणे तुम्ही तुमच्या पसंतीचा आधार क्रमांक बदलु शकता?

इक्बाल शेख
संपादक

आजच्या काळात आधार कार्ड हे
भारतातील एक अनिवार्य दस्तऐवज आहे. याशिवाय तुम्ही कोणतेही सरकारी किंवा बिगर सरकारी काम किंवा बँकेशी संबंधित कोणतेही काम करू शकत नाही.

म्हणूनच तुमच्यासाठी आधारशी संबंधित प्रत्येक नियमावर अपडेट असणे महत्त्वाचे आहे. वेळोवेळी, UIDAI तुमच्यापर्यंत आधार कार्डशी संबंधित प्रत्येक माहिती पोहोचवते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.

दरम्यान, आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे. की, वाहनाच्या क्रमांकाप्रमाणे आपण आपल्या इच्छेनुसार आधार कार्डचा क्रमांक घेऊ शकतो का? UIDAI ने कोणती माहिती दिली आहे. ते जाणून घेऊया

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी आॅफ इंडिया (यूआयडीएआय) ने दिल्ली उच्च
न्यायालयात एका व्यापाऱ्याला नवीन आधार क्रमांक जारी करण्याच्या मागणीच्या अर्जाला विरोध केला आहे. आणि असे म्हटले आहे की, अशी मागणी करणे म्हणजे त्यांच्या आवडीचा वाहन नोंदणी क्रमांक मागणाऱ्या लोकांच्या मागणीसारखे असेल.

प्राधिकरणाची बाजू मांडणारे वकील जुहैब हसन हे न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्यासमोर म्हणाले, की लोकांना त्यांच्या निवडीचा क्रमांक मागण्याची मुभा दिली तर “वाहनासाठी फॅन्सी नंबर प्लेटची
मागणी केल्यासारखे होईल”

खरं तर, न्यायमूर्ती पल्ली हे एका अर्जावर सुनावणी करत आहेत ज्यामध्ये आधार क्रमांकासह याचिकाकर्त्यांच्या वैयक्तिक तपशीलांशी तडजोड करण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना त्यांच्या पसंतीचा आधार क्रमांक जारी केला जात आहे. हसन म्हणाले की सध्याची फ्रेमवर्क आधार कार्ड धारकांना अनेक स्तरांची सुरक्षा प्रदान करत आहे. आणि जर हा अर्ज स्विकारला गेला तर मोठ्या संख्येने लोक त्यांचा आधार क्रमांक बदलण्याची मागणी करण्यासाठी पुढे येतील. त्याचवेळी, त्यांनी असेही सुचवले की याचिकाकर्त्याने त्याचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता जोडला पाहिजे जेणेकरून त्याच्या आधार क्रमांकाचा गैरवापर होणार नाही.

या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होईल.