ओला दुष्काळ जाहीर करा – बाळासाहेब ठोंबरे

प्रतिनिधी
24सात । मराठी


यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु 23 सप्टेंबर रोजी झालेल्या आतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे व घरांचीही पडझड झालेली आहे.

सर्व नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतातील पिके वाहुन गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संकटकाळामध्ये शासनाने शेतकऱ्यांना आधार देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे व पडझडीचे तात्काळ पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहिर करावा व तसेच शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन पिकविमा लागु करावा. अशी मागणी केज तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे यांनी केज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपेंद्र शिंदे, सचिन राऊत व इतर कॉंग्रेस चे पदाधिकारी उपस्थिती होते.