त्रिपुरा येथील घटनेचा मुस्लिम समाजाकडून केजमध्ये निषेध

आरेफ इनामदार
24सात । मराठी

केज : त्रिपुरा येथे 26 ऑक्टोबर रोजी विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या रॅलीमध्ये मशीद आणि रहिवाशांच्या घरांची कथित तोडफोड त्रिपुरा राज्यातील आगरतळा पासून सुमारे 220 किलोमीटर अंतरावर असलेल्या रोवा गावात विश्व हिंदू परिषद व इतर समाजकंटक लोकांनी रॅलीच्या नावाखाली जास्तीत जास्त संख्येत लोकांना गोळा करून मुस्लिम समाजाचे मशीद घरे दुकाने जाळणे लुटने व पवित्र धर्मग्रंथ कुरआन ग्रंथाची विटंबना करने आणि मुस्लिम समाजाची आस्था असणारे व सर्व प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपशब्दाचे वापर केले असून विश्व हिंदू परिषद व इतर धर्मांध समाजकंटक व संघटना यांच्यासह त्यांच्याशी संबंधित पोलिस कर्मचारी व अधिकारी या सर्व लोकांवर कार्यवाही करण्याची मागणी करत दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी शहरातुन रॅली काढून तहसील कार्यालय केज येथे मुस्लिम समाजाकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी रजा अकॅडमी चे हाफिज मुकीम खतीब सहाब, हाफिज उमर सहाब, हाफिज सलिम खुरेशी सहाब यांच्यासह मुस्लिम धर्मगुरू व मुस्लिम समाजातील अनेक तरुण निवेदन देण्यासाठी हजर होते.