केज नगरपंचायत निवडणुक ग्राउंड रिपोर्ट

इक्बाल शेख
24सात । मराठी

सुमारे सात वर्षांनंतर होणाऱ्या केज नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असताना निवडणूक आयोगाने ओबीसींच्या आरक्षणावर मार्ग काढत पुन्हा आरक्षण सोडत जाहीर केलेले आहे. 15 नोव्हेंबर 2021 रोजी सोडत पद्धतीने जाहीर झालेल्या आरक्षणानंतर शहरातील प्रतिष्ठितांचे गणित चांगलेच कोलमडले होते. स्वतःचे निश्चित केलेले वार्ड सोडून इतर वार्डामध्ये उमेदवारी लढवण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.

सध्या सर्वसामान्यांमध्ये शहरातील प्रतिष्ठीत लढवत असलेल्या वार्ड बद्दल अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. असे असले तरी, ते त्या त्या वार्डातुन निवडून येतील असे आजच्या सर्वेक्षणातुन स्पष्ट होत आहे. मात्र त्यांना थोडी अधिकची मेहनत करावी लागणार आहे.

पॅनल किती असतील आणि कोणाची होणार युती?

सध्याच्या सर्वेक्षणानुसार काही दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जिल्ह्यात कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार केज नगरपंचायत निवडणुक कॉंग्रेस स्वबळावर लढवणार आहे हे निश्चित झाले आहे. कॉंग्रेस ने 17 वार्डातील उमेदवार निश्चित केले असुन काहीं उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे तर काही उमेदवार अजुन गुलदस्त्यात ठेवण्यात आहेत. ज्यामध्ये वार्ड क्रं. 2, 4, 8, 9, 12, 15, 16 आणि 17 या उमेदवारांबद्दल अजुन निश्चिती नसल्याचे चित्र स्पष्ट आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीकडे 14 तर शिवसेना 2 आणि शेकाप 1 जागेवर या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले जाते. मात्र राष्ट्रवादी ने अजुन आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

शहरातील नगरपंचायत निवडणुकीत तिसरा पर्याय असलेला जनविकास परिवर्तन आघाडी पॅनल. हारुण भाई इनामदार यांनी जनविकास ची स्थापना करत शहरातील राजकीय दिग्गजांना यामध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. जनविकास परिवर्तन आघाडी ने 2, 3, 6, 7, 10, 11, 12 आणि 17 या वार्डातील उमेदवारी स्पष्ट केली असुन थोड्या फार प्रमाणात यातील बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एआयएमआयएम चे जिल्हाध्यक्ष शेख शफिक भाऊ यांनी केज येथील विश्रामगृह येथे बैठक घेऊन केज नगरपंचायत मधील सर्व जागा लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार केज शहराध्यक्ष तालेब इनामदार यांनी वार्ड क्रं. 10 निश्चित करुन इतर 6 वार्डातुन चाचपणी सुरु केलेली आहे.

केज नगरपंचायत निवडणुकीतील घडामोडींची सखोल आणि अचूक माहिती आपणास 24सात च्या माध्यमातून मिळणार आहे.