धारुर महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सय्यद सलीम सेवानिवृत्त

इक्बाल शेख
संपादक, 24सात । मराठी

तब्बल चाळीस वर्षे इमानदारीने विद्युत महावितरणच्या माध्यमातून अविरत सेवा केल्यानंतर 31 डिसेंबर रोजी वर्षाच्या अखेरीस वरिष्ठ तंत्रज्ञ सय्यद सलीम सय्यद युसुफ यांचा धारुर येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

1980 साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये रोजंदारीवर काम करुन ग्राहकांची सेवा करणारे सय्यद सलीम यांना विद्युत मंडळाने 1993 मध्ये कायमस्वरुपी लाईनमन या पदावर रुजू करून घेतले. यानंतर 28 वर्षे इमानदारीने काम करत महावितरणच्या ग्राहकांची विनातक्रार सेवा केली. लाईनमन ते ऑपरेटर आणि वरिष्ठ तंत्रज्ञ असा प्रवास करत 40 वर्षे पूर्ण करून 31 डिसेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. सय्यद सलीम सय्यद युसुफ हे मुळचे केजचे रहिवाशी आहेत, सय्यद सलीम यांचे वडील हे लाईनमन या पदावर होते. त्यांचे बंधु आणि पुतणे हे सुद्धा महावितरणमध्ये कार्यरत आहेत.

धारुर येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील सभागृहात सय्यद सलीम यांचा भव्य कार्यक्रमात सापत्निक सत्कार करण्यात आला. सलीम यांचा सत्कार करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या आईचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्याची इच्छा दर्शवली. जिच्या आशिर्वादाने मी संपुर्ण सेवा इमानदारीने करु शकलो आज तिच्या समोर मी सेवा निवृत्त होत आहे. असा प्रसंग फार क्वचित लोकांना लाभतो असे म्हणत सलीम मामु यांना अश्रू अनावर झाले नाही.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपअभियंता पेंसिलवार साहेब प्रमुख पाहुणे म्हणून केज नगरपंचायत चे गटनेते हारुण इनामदार, सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे इंजि. सादेक इनामदार, होळ आणि आडस उप केंद्राचे कनिष्ठ अभियंता, महावितरणचे कर्मचारी यांच्यासह सय्यद सलीम यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व मान्यवरांनी सय्यद सलीम यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.