हारुनभाई इनामदार यांच्याकडून शहरातील विकास कामांना सुरुवात

इक्बाल शेख,
संपादक, 24सात मराठी


केज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 नुकतीच पार पडली आहे. यामध्ये हारुणभाई इनामदार यांनी बहुमत सिध्द करुन केज नगरपंचायतवर आपला झेंडा फडकवला आहे.

विजयाच्या आनंद सोहळ्यानंतर तात्काळ हारुन इनामदार यांनी शहरवासीयांच्या समस्येवर आपले लक्ष केंद्रित करत विकास कामांची सुरवात केली आहे. शहरातील कळंब रोड भागातील वार्ड क्र. 8 मधील नागरिकांना पाण्याची समस्या भेळसावत असल्याचे प्रचारादरम्यान नागरिकांनी समस्या मांडली होती. जनतेला दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून इनामदार यांनी तात्काळ बोअरवेल घेऊन नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. या भागातील नागरिकांनी हारुन भाई इनामदार आणि नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांचे आभार मानले.

केज शहरातील विकास कामांची सुरवात प्रभाग क्र. 8 मधून करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक वार्डातील मूलभूत सुविधा सोडवण्याचा प्रयत्न जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून करणार असल्याचे हारुन इनामदार यांनी म्हटले आहे. कामे करत असताना कुठलाही पक्षपात होणार नाही विरोधकांच्या वार्डातही भरपूर कामे होतील अशी ग्वाही इनामदार यांनी दिली.

महाराष्ट्रात चर्चेत असलेले हारुणभाई इनामदार यांचे सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जाते आहे.