न्यूज 24सात मराठी टिमतर्फे नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार

न्यूजरुम
24सात | मराठी

केज नगरपंचायतमध्ये जनविकास परिवर्तन आघाडी पॅनलची सत्तास्थापनेनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचे सर्वस्तरातुन सत्कार करण्यात येत आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील इनामदार कॉम्प्लेक्स येथे न्यूज 24सात मराठीच्या टिमकडून जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुनभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, गटनेते राजुभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, पप्पुभाई इनामदार, सुग्रीव भाऊ कराड, सुमेध बप्पा शिंदे, स्विकृत नगरसेवक मुस्तफा भाई खुरेशी यांच्यासह आसेफ इनामदार, अशोक सोनवणे, अतुल कुलकर्णी, पापा इनामदार, विकी लोखंडे, शाकेर इनामदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी न्यूज 24सात मराठीचे संपादक इक्बाल शेख, आरेफ इनामदार, भागेश अन्नदाते, रंजित कांबळे यांनी नवनिर्वाचितांचा सत्कार करुन पुढील कार्यास अभिनंदन केले.