इशु एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी मध्ये महिला दिन उत्साहात साजरा

संपादक,
24सात । मराठी

8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त केज शहरातील सुसज्ज असलेल्या इशु एज्युकेशन & टेक्नॉलॉजी मध्ये जागतिक पातळीवरील महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. जागतिक स्तरावरील महिलांनी केलेले कार्य व आज करत असलेले नेतृत्व यात प्रामुख्याने भारतातील महिलांचा असलेला योगदान या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली होती.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी कु.फारोखी अलिशा मतिन व कु. जाधव ज्ञानेश्वरी वेंकटराव या दोन्ही विद्यार्थ्यांनींनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक कु. शुभांगी थोरात हिने पटकावले आहे. विद्यार्थीनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन सहभाग नोंदवला होता. तसेच इशु एज्युकेशन & टेक्नॉलॉजी परिसरात रांगोळी काढून सजावटही करण्यात आली होती.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा आदर्श घेऊन महिलांनी सक्षम नारीचे जीवन जगावे. असे आवाहन संस्थेचे सचिव जिशान हिमायत कादरी यांनी कार्यक्रमदरम्यान केले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.