छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा ठराव मंजुर

इक्बाल शेख
24सात । मराठी


महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा प्रश्न गेली अनेक वर्षांपासून प्रलंबीत होता. केज शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ पुतळा बसवण्याचा ठराव नगर पंचायत च्या पहिल्या सभेमध्ये मांडण्यात आला होता. ठरावास संमती देत सर्व 19 नगरसेवकांनी एकमताने मान्यता दिली आहे. याचबरोबर मुख्य रस्त्यावरील असलेल्या आला हज़रत मुरशद बाबा यांच्या चौकासह शहरातील सर्व चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे पहिल्या सभेत सर्वानुमते एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.

शहरातील सर्वधर्मीयांचा अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या महापुरुषांच्या नावाने असलेल्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, आला हजरत मुरशद बाबा चौक, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर प्रवेशद्वार, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, संत भगवान बाबा चौक, जय भवानी चौक, हज़रत टिपु सुलतान चौक, मौलाना आझाद चौक इत्यादी चौकांचे सुशोभीकरण होणार असल्याचे जनविकास परिवर्तन आघाडीचे हारुणभाई इनामदार नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद लातुर राज्य महामार्गाचे रुंदीकरण होत असताना आला हज़रत मुरशद बाबा चौकाचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली होती. मागणीवेळी दिलेला शब्द पहील्याच ठरावात पुर्ण केला असल्यामुळे हारुणभाई इनामदार यांचे सर्वस्तरातुन आभार मानले जात आहे.

महापुरुषांच्या नावाने असलेल्या चौकांचे सुशोभीकरणाबरोबरच इतरही 50 मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सर्व ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आले. यावेळी 100% सदस्यांची उपस्थिती होती.