PACL गुंतवणुकदारांना सेबीकडून मुळ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सुचना जारी

इक्बाल शेख,
संपादक, 24सात । मराठी

PACL (pearls) गुंतवणुकदारांसाठी SEBI यांच्याकडून मुळ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली आहे. PACL मध्ये अनेक गुंतवणुकदारांनी अमिषापोटी पैसे गुंतवलेले होते. मात्र कालांतराने कंपनी बंद पडल्याने गुंतवणुकदार हवालदिल होऊन गुंतवलेले पैसे परत मिळण्याची आशा सोडून दिली होती. सदरील प्रकरण न्यायालयापर्यंत गेल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण सेबीकडे (SEBI) सोपविण्यात आले. निवृत्त न्यायमुर्ती आर. एम. लोढा या नावाने समिती स्थापन करण्यात आली. गुंतवणुकदारांना मुळ प्रमाणपत्राच्या प्रती सेबी कार्यालयाकडे जमा करण्याकरीता SMS द्वारे संदेश पाठवण्यात आले आहे.

1. न्यायमूर्ती (निवृत्त) आर.एम. लोढा समितीने (PACL च्या प्रकरणाबाबत) पात्र गुंतवणूकदारांकडून PACL चे मूळ नोंदणी प्रमाणपत्रे मागवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्या दाव्याची रक्कम रु. 10,001/- ते रु. 15,000/- पर्यंत आहे, आणि ज्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने सेबीकडे प्राप्त झाले आहेत. अशा यशस्वीरित्या सत्यापित केलेल्या पात्र गुंतवणूकदारांना सेबीकडून एक संदेश (एसएमएस) पाठवला गेला आहे. ज्यामध्ये त्यांना PACL चे मूळ नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे.

2. PACL चे गुंतवणूकदार ज्यांना समितीकडून एक संदेश (SMS) प्राप्त झाला आहे त्यांनी PACL ने जारी केलेले मूळ प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यांनी त्यांची मूळ प्रमाणपत्रे खालील पत्त्यावर पाठवण्यास सांगितले आहे.

P.O Box No.66, Belapur Post Office, Navi Mumbai – 400614

अधिक माहितीसाठी आपण 022-61216966 या क्रमांकावर संपर्क साधु शकता

3. गुंतवणूकदाराने लिफाफ्यात फक्त PACL ची मूळ प्रमाणपत्रे पाठवावीत आणि प्रमाणपत्र क्रमांक लिफाफ्यावर लिहिलेला असणे आवश्यक आहे. PACL चे फक्त 1 (एक) मूळ प्रमाणपत्र एका कव्हरमध्ये पाठवावे.

4. मूळ प्रमाणपत्रे 1 एप्रिल 2022 ते 30 जुन 2022 पर्यंतच स्विकारले जाणार आहेत.

5. गुंतवणूकदारांनी PACL चे मूळ नोंदणी प्रमाणपत्र पॅरा 2 मध्ये दिलेल्या पत्त्यावर 30 जुन 2022 रोजी संध्याकाळी 05:00 पर्यंत पोहोचेल याची खात्री करणे आवश्यक आहे.

6. गुंतवणूकदारांनी PACL च्या नोंदणी प्रमाणपत्राच्या मूळ प्रती कोणालाही देऊ नयेत. असा इशारा सेबीकडून देण्यात आला आहे. जोपर्यंत त्यांना समितीकडून या संदर्भात संदेश (SMS) प्राप्त होत नाही ज्यामध्ये त्यांना प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती सादर करण्यास सांगितले आहे. तोपर्यंत मुळ प्रमाणात पाठवण्यात येऊ नये. असेही समितीकडून सांगण्यात आले आहे.

 

24सात न्यूजकडून विचारले गेलेले काही प्रश्न

प्रश्न क्र. 1
ज्या गुंतवणुकदारांनी PACL चे मुळ प्रमाणात कंपनी बंद होण्यापूर्वी सादर केलेले आहे त्यांचे काय?

प्रश्न क्र. 2
ज्या गुंतवणुकदारांचे मोबाईल क्र. बंद झालेले असतील किंवा क्र. बदले असतील त्यांना संदेश कसा प्राप्त होणार?

प्रश्न क्र. 3
कंपनी बंद होऊन 8 वर्षे होऊन गेली मोठी रक्कम मिळण्यास अजुन बराच कालावधी लागणार आहे. या कालावधी दरम्यान मुळ प्रमाणपत्राच्या प्रति जिर्ण होत चालले आहेत. ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशावेळी त्या गुंतवणुकदारांच काय?

प्रश्न क्र. 4
अनेक गुंतवणुकदारांचे ऑनलाईन केल्यानंतर बँक खाते किंवा इतर तत्सम त्रुटी झालेल्या आहेत. त्यांचे काय?

असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांसमोर भेडसावत आहेत. मात्र त्याचे उत्तर अजुन कोणाकडूनही मिळालेले नाही. कारण ज्यांनी एजंटकडे गुंतवणूक केली आहे पैशापोटी त्यांचा आणि एजंटचा वाद होऊन संपर्क तुटलेला आहे. ज्यामुळे अनेक एजंट गुंतवणुकदारांपासुन नॉट रिचेबल आहेत.