आजान सुरु होताच तरुणांनी जयंतीतील डीजे केला बंद

इक्बाल शेख,
संपादक, 24सात न्यूज

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी केज शहरातील फुले नगर भागातुन रॅली काढत युवकांनी सर्वधर्म समभाव राखत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीप्रमाणे मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनेचा आदर करत डीजे चा आवाज बंद करुन राजकीय भाषणातून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला चांगलाच चोप दिला आहे.

फुले नगर भागातुन डीजे च्या तालावर झिंगाट डान्स करत तरुणाई चा जल्लोष सुरु होता तेवढ्यात मशीदीतील भोंग्यातुन आजानचा आवाज येताच सर्व तरुणांनी आपला जल्लोष बाजुला ठेऊन आजान संपेपर्यंत डीजे पुर्णतः बंद ठेवला. आपल्या धर्माचा अभिमान आणि इतर धर्मियांच्या रुढी परंपरांचा आदर कसा करावा या बाबासाहेबांच्या शिकवणींचा वारसा फुले नगर भागातील तरुणांनी पुढे नेला आहे.

राज’कीय पोळी भाजण्यासाठी आणि जातीयवादी पक्षांना खुष करण्यासाठी काही राज’कीय नेते प्रक्षोभक भाषणातून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवुन तरुणांची माथी भडकावण्याचे काम सध्या राजकीय वर्तुळातुन सर्रास होताना दिसत आहे.

मात्र फुले नगर भागातील तरुणांनी मुस्लिम धर्माचा केलेला आदरयुक्त सन्मान यालाच खरी बाबासाहेबांनी दिलेली शिकवण म्हणावी लागेल.