पात्रुड येथुन मालासह अपे रिक्षाची चोरी

आरेफ इनामदार
प्रतिनिधी

माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथुन स्टेशनरी (कटलरी) माल भरलेल्या तीनचाकी अपे रिक्षा चोरीस गेल्याची घटना गुरुवारी 28 जुलै 2022 रोजी उघडकीस आली.

बाजार करुन आलेले कटलरी व्यापारी फैजान जमील मोमीन आणि सय्यद असलम यांनी पात्रुड येथील पोलीस चौकी परिसरातील दर्गा रोड येथे त्यांच्या दुकानासमोर सुमारे 2 लाख रुपयांचा स्टेशनरी माल भरलेला MH-21-1418 या क्रमांकाचा अपे रिक्षा रात्री उभा केला होता. गुरुवारी 28 जुलै 2022 रोजी रात्री 3:00 ते 4:00 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रिक्षाचा काच फोडून चोरी केल्याचे सकाळी व्यापारी फैजान मोमीन आणि सय्यद असलम यांना रस्त्यावर पडलेल्या काचाच्या तुकड्यांमुळे लक्षात आले. यावेळी त्यांनी गावात आणि परिसरात अपे रिक्षाचा शोध घेतला मात्र त्याचा कुठेही शोध लागला नाही.

याबाबत त्यांनी माजलगांव पोलीसांत तक्रार ही दाखल केलेली आहे. वरील फोटोतील अपे रिक्षा कोणास आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा फैजान मोमीन यांच्या मोबाईल क्र. 9970572670 यावर संपर्क साधावा.