राष्ट्रध्वज सरळ करत असताना वीर मरण पावलेले मुख्तार शेख यांच्या कुटूंबियांना एमआयएम ची भेट

इक्बाल शेख,
संपादक, 24सात न्यूज

केज तालुक्यातील वरपगाव येथील तीस वर्षीय तरुण मुख्तार शेख यांनी आपल्या घरावर लावलेला तिरंगा ध्वज झुकलेला होता तो सरळ करत असताना विजेचा शॉक लागून जागेवर शहीद झाले. या घटनेची माहिती समजताच एआयएमआयएम बीड जिल्हा अध्यक्ष ॲड शेख शफीक भाऊ यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा प्रवक्ते शेख रमीज सर, अंबाजोगाई शहर अध्यक्ष हिफाजत पठाण, केज शहर अध्यक्ष तालेब इनामदार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शेख कुटुंबाची भेट घेतली व एआयएमआयएम च्या वतीने मदतीचा हात दिला जाईल असे आश्वासन दिले.

एआयएमआयएम प्रवक्ता शेख रमीज सर यांनी प्रशासकीय पातळीवर राज्य शासनातर्फे पाहिजे तेवढी मदत करता येईल यासाठी प्रस्ताव घेऊन जाऊन मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

वरपगाव येथील मठाच्या रस्त्याच्या कडेला शेख कुटुंब शेतात घर बांधून राहतात. मुलगा सुशिक्षित होता वडील जेमतेम शिक्षण झालेले मात्र शेतात मेहनत करून कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवत होते. मुलगा शिकून कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना अचानक देश प्रेमापोटी जगाचा त्यांनी निरोप घेतला. शेख मुख्तार यांचे वडील शेख इसाकोद्दीन हे कमी शिकलेले असले तरी आपल्या मुलाने देशाचा झेंडा झुकू नये यासाठी प्रयत्न करताना वीरमरण आले. त्यामुळे मुलाच्या जाण्याचे दुःख नसुन माझ्या मुलाने देशाच्या तिरंग्याचा मान राखण्यासाठी आपला जीव गमावला आहे. मात्र झेंडा झुकू दिलेला नाही. याची खासदार इम्तीयाज जलील यांनी दखल घेऊन माझ्या मुलाला शहिदाचा दर्जा मिळून द्यावा अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी वरपगाव येथे एआयएमआयएम चे अनेक कार्यकर्ते हजर होते. शेख कुटूंबियांना सांत्वन बरोबरच प्रशासकीय पातळीवरील मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे.