तलाठी, मंडळ अधिकारी यांनी सज्जाच्या ठिकाणी रहावे MIM ची मागणी

केज तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना मुख्यालयी (सज्जा) च्या ठिकाणी राहण्याचे आदेश पारित झालेले असताना देखील AIMIM ने अनेक निवेदने देऊनही अद्यापपर्यंत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

केज तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या सज्जावर राहत नाहीत व तालुक्याच्या व इतर सोयीच्या ठिकाणी राहुन कामकाज पाहतात. ज्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, वृध्द माहिला पुरुष व निराधार नागरीक यांना लागणारे अवश्यक ते कागदपत्रे जसे की, 7/12, 8अ, पीक पेरा, उत्पन्नाचे दाखले इत्यादी कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावे. यासाठी तलाठी यांना सज्जाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक करावे.

तसेच ते आपल्या खाजगी व्यक्ती (रायटर) मार्फत काम पाहत असतील तर त्यांचावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे तलाठी यांच्या नियोजित दौऱ्याबाबत कसल्याही प्रकारचा फलक लावला जात नाही. तसेच तलाठी यांनी स्वत:चा मोबाईल नंबर हा सुचना फलकावर लिहण्यात यावा अशी मागणी AIMIM चे केज शहर अध्यक्ष अबुतालेब वलीयोद्दीन इनामदार यांनी दि. 17/10/2022 रोजी मा. तहसीलदार केज यांना दिले आहे.

पुढील आठ दिवसांत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर सज्जा संदर्भात योग्य ती कार्यवाही न झाल्यास मा. विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे अबुतालेब वलीयोद्दीन इनामदार यांनी निवेदनात म्हटले आहे.