राज्याचे GST उपायुक्त यांची केज येथे भेट

इक्बाल शेख,
संपादक, 24सात न्यूज

 

मिशन आयएएस या मोहिमेअंतर्गत केज येथील जीवन शिक्षण संकुल परिसरात मराठवाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मिशन आयएएस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेसंदर्भात पाहणी करण्यासाठी राज्याचे वस्तु व सेवा कर विभागाचे (GST) उपायुक्त एम. एस. कासार यांनी भेट दिली.

देशातील 350 आयएएस अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन सुरु केलेली मिशन आयएएस मोहीम इयत्ता पाचवी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयएएस अभ्यासक्रमाची माहीती मिळावी यासाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तके व महीन्यातुन एका आयएएस अधिकाऱ्याचे मार्गदर्शन मिळणार आहे. देशातील मोजक्या ठिकाणीच अशा मार्गदर्शन केंद्राची उभारणी होणार आहे. मराठवाड्यातुन केज येथील जीवन शिक्षण संकुल येथे मिशन आयएएस या निवासी मार्गदर्शन केंद्राची उभारणी होणार असल्याचे हारुण इनामदार यांनी म्हटले आहे.

मराठवाड्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहता आले पाहिजे आणि त्यांचे स्वप्न मिशन आयएएस च्या माध्यमातून आम्ही सर्व आयएएस अधिकाऱ्यांनी मिळून सुरु केलेली मोहीम साकार करेल असे मत राज्याचे GST उपायुक्त एम. एस. कासार यांनी व्यक्त केले.

यावेळी एम. एस. कासार यांचा सत्कार करताना जीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हारुण इनामदार, नगराध्यक्षा सिताताई बनसोड, मंडळ अधिकारी सोहील इनामदार, बन्सल क्लासेस चे व्यवस्थापक यासीन इनामदार, पत्रकार इक्बाल शेख, पत्रकार सादत मंत्री, मेजर अजिमोद्दीन इनामदार, नौशाद रजा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.