तहसीलदार डी. सी. मेंडके केजकरांसाठी वरदान ठरत आहेत.

आपण चित्रपटात एखादा अधिकारी रस्त्यावर येऊन कारवाई करताना पाहिला असेल पण इथे खरे – खुरे अधिकारी रोडवर येऊन मागील वर्षापासून कोरोना युद्धात स्वतःला झोकून आपला तालुका म्हणजे आपले घर आणि या तालुक्यातील लोक म्हणजे आपले फॅमिली सदस्य असे समजून या आपल्या घरात कसलाही कोरोना सारखा आजार येऊ नये या साठी आपत्ती व्यवस्थापन / पोलीस टीम ला सोबत घेऊन दिवसरात्र काम करत असलेले अधिकारी म्हणजे तहसीलदार दुल्हाजी मेंडके होय.

कोरोना आजार जसा ही आला तसा शासनाच्या आदेशानुसार व जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्यात या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल, आरोग्य, नगरपंचायत, शिक्षक व इतर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन पूर्ण तालुक्यात फिरून नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनेचे पालन करावे या साठी सर्व टीम कामाला लावली.

केज तालुक्यातील एकुण 132 हून अधिक च्या गावे फिरुन गावागावात जाऊन तेथील ग्रामपंचायत व मंडळधिकारी / तलाठी यांना भेटी देऊन तेथील गावकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी ग्रामपंचायत ला सुचना दिल्या. तसेच जे शासनाचे नियम व अटी पाळत नाहीत त्या लोकांना / दुकानदारांना पण दंड देऊन प्रशासनाचा दबदबा व लक्ष शेवटच्या व्यक्ती व टोकापर्यंत आहे हे दाखवून दिले.

गावातील कट्ट्यावर रिकामे बसणारे टोळके असोत वा मास्क न घालता मोकाट फिरणारे नागरिक असो. किंवा दुकानात गर्दी करणारे दुकानदार असोत वा रोडवर लागणारे हातगाडे असो तहसीलदार साहेबांची गाडी व त्यांचे पथक येताच दोनच मिनिटात सर्व व्यवस्थित होते. तहसीलदार यांच्या पथकात आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख सुरज कदम, महादेव पारवे, संजय भागवत,माऊली इगवे, शुभम गीते, ढाकणे, निखिल पोटभरे हे नेहमी सोबत असतात.

अधिकारी होण्यासाठी आजची तरुण पिढी जीवाचे रान करत आहे. एक अधिकारी काय करु शकतो हे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार मेंडके सरांच्या रुपाने जनतेला दिसून आलेले आहे. तहसीलदार यांनी कामाची चुनुक दाखवून ते आज केज तालुक्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.

कुठल्याही विरोधाला न जुमानता चांगले अधिकारी जनतेच्या हिताचे निर्णय घेत असतात. मुळात अधिकारी हे जनतेचे रक्षकच असतात. जनतेच्या हिताची कामे करणे आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवणे हे अधिकार्‍यांचे काम असते.

शेतकरी कुटूंबामधुन अधिकारी झालेले दुल्हाजी मेंडके हे आपण ज्या गरीबीत जन्माला आलो त्या परिस्तिथीला न्याय देत सर्वसामान्य लोकांना समजावून घेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पण प्रयत्न करत आहेत. आपल्या पदाचा योग्य वापर करत समाजासाठी आपली खुर्ची झिजवून एक नवा इतिहास घडवुन व सामाजिक परिवर्तनाचे साक्षीदार बनुन आज साहेब काम करत आहेत!

केज तालुक्यातील नागरिक आज खरंच खूप समाधानी आहेत की रस्त्यावर उतरून कारवाई करणारे तहसीलदार यांनी पहील्यांदाच पाहिले आहे.

नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचा भंग करू नये, जो कोणी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचा भंग करेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाडुन सांगण्यात आले आहे.