लाॅकडाऊन काळात शेतीशी संबंधित दुकाने सुरु ठेवण्यात यावीत – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

केज : मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या कामाला वेग द्यावा लागतो. राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस दिवस वाढत चालली असल्याने राज्य सरकारकडून 15 मे ते 31 मे या दरम्यान कडक लाॅकडाऊनचा आदेश निघालेला आहे. यामुळे या काळात शेतातील पुर्व हंगामी कामे करण्यासाठी कृषी सेवा केंद्रे व इतर शेतीशी निगडीत असलेली दुकाने बंद राहतील. ज्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

केज तालुका राष्ट्रीय काँग्रेस ने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. आज शेतकऱ्यांना शेतीकामासाठी कृषी सेवा केंद्र व याविषयी आस्थापनांना दुकाने उघडण्याची मुभा दिली तर शेतकऱ्यांना भविष्यात येणाऱ्या आडचणी उद्भवणार नाहीत. व तसेच लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर कृषी सेवा केंद्रावर होणारी गर्दी टाळता येऊ शकेल. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ही उद्भवू शकणार नाही.

केज तहसील मार्फत जिल्हाधिकारी यांना 13 मे रोजी दिलेल्या एका निवेदनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बिपीनचंद्र ठोंबरे, नगरसेवक पशुपतीनाथ दांगट, समीर देशपांडे यांनी मागणी केली आहे.