लस घेणाऱ्या नागरिकांना आता मंडपाचे छत; उन्हापासून होणार संरक्षण!

केज : शहर व तालुक्यातील नागरिकांना लस घेण्यासाठी केजच्या उप जिल्हा रुग्णालयात यावे लागते व लसीसाठी गर्दी होत असल्याने उन्हात थांबावे लागत होते व या परिस्थितीची दखल घेऊन काँग्रेसचे युवा नेते पशुपतीनाथ दांगट यांनी त्यांच्या आत्माराम बापू पाटील सामाजिक प्रतिष्ठाण च्या वतीने मंडप देण्यात आल्याने आता नागरिकांना व रुग्णांचा आता उन्हाच्या त्रासापासून बचाव होणार आहे. याबद्दल जिल्हा उप रुग्णालयाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता राज्यात लसीकरण मोठय प्रमाणात वाढवण्यासाठी सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत मात्र लस घेण्यासाठी आलेले वृद्ध मंडळी, महिला व पुरुष या सर्वांना गर्दीमुळे उन्हात लाईनला उभे राहून लस घ्यावी लागत आहे व लसीकरणासाठी नागरिक मोठया संख्येने येत आहेत त्यामुळे गर्दीही वाढत आहे. या सर्व बाबीची माहिती घेऊन काँग्रेसचे युवक नेते, नगरसेवक पशुपतीनाथ दांगट यांनी उप जिल्हा रूग्णालयाच्या समोर मोठा मंडप उभा केला असून यामुळे आता नागरिकांना लस घेण्यासाठी आल्यावर उन्हात न उभारता सावलीचा मोठा सहारा मिळणार आहे त्यामुळे हा मंडप पूर्णपणे उन्हाळ कमी होईपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे पशुपतीनाथ दांगट यांनी सांगितले.
प्रतिष्ठाण च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या मंडपामुळे नागरिकांची मोठी सोय झाली असून उप जिल्हा रुगणलायच्या प्रशासनाने व नागरिकांनी देखील आभार व्यक्त केले आहेत.