कोरोनाची लस हाताच्या दंडावरच का देतात? जाणुन घ्या याबाबतची अधिक माहीती

इक्बाल शेख,
24सात । मराठी

जेव्हा लसीचा विषय निघतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात इंजेक्शनची कल्पना येते पण असे नाही की प्रत्येक लस फक्त इंजेक्शननेच दिली जाते. पोलिओचे औषध तोंडातून दिले गेले होते आणि हे औषध एक प्रकारची लसच आहे . तर जाणून घ्या कोविड -१९ ची लस हाताच्या दंडावरती का दिली जाते.

बहुतेक लस ह्या स्नायूंमध्ये दिल्या जातात

हाताच्या दंडावरती दिली जाणारी ही पहिली लस नाही, बहुतेक लस ह्या स्नायुंमध्येच दिल्या जातात ज्या इंट्रामस्क्युलर इंजेक्शनद्वारे स्नायूंमध्ये दिल्या जातात. होय, गोवर, गालगुंड , रुबेला यांच्या लस आणि यासारखे काही खास रोग असलेल्या व्यक्तींना ही लस स्नायुंमध्येच दिली जाते.

स्नायूंमध्ये इंजेक्शन देण्याचे कारण म्हणजे ही लस खांद्याच्या त्रिकोणी स्नायू असलेल्या डेल्टॉइड नावाच्या स्नायूवर लावणे योग्य आहे. परंतु या व्यतिरिक्त, हे मांडीच्या आधीच्या स्नायूंना देखील देऊ शकता.

या परिस्थितीत अधिक प्रभावी असते लस

वैद्यकीय तज्ञांच्या मते, एखाद्या स्नायूला लस लावण्याचा फायदा म्हणजे प्रतिकार प्रतिसादाची उत्तेजन क्षमता ही लस प्रभावी करते आणि ही लस दिली जाते त्या ठिकाणी रीऍक्शन येण्याची शक्यता देखील कमी करते. याव्यतिरिक्त, कोविडची लस हाताच्या दंडावरती देण्यासाठीच डिझाइन केली गेली आहे.

लस कशी कार्य करते

एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या किंवा मांडीच्या स्नायूंना ही लस देताच ती प्रथम जवळच्या लिम्फ नोडमध्ये जाते.
यानंतर ही विशेष पेशीपर्यंत पोहचते ह्या टी आणि बी पेशी असलेल्या पांढऱ्या रक्त पेशींना कोरोनासोबत लढण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करते.

या पेशींचे काय होते?

या प्रशिक्षणात, शरीराच्या पेशी एकतर प्राणघातक पेशी बनतात, ज्या कोरोना विषाणूमुळे पीडित असलेल्या व्यक्तीच्या पेशी नष्ट करतात किंवा त्या अँटीबॉडी फ्लो करणाऱ्या पेशी बनतात . या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्नायू महत्त्वपूर्ण आहेत, कारण त्यात विशिष्ट प्रकारच्या प्रतिरोधक पेशी असतात.